;">
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाउच खुर्द आपले सहर्ष स्वागत करत आहे.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

कळसुबाई शिखर

                                                                   कळसूबाई  शिखर 

                  महाराष्ट्राचेसर्वोच्च शिखर कळसूबाई हे सह्याद्रीचे मानबिंदू आहे. हिमालयातील शिखरांवरचढाई करणारे गिर्यारोहक या शिखराला आवर्जून भेट देतात. सह्याद्रीचा हापरिसर अभयारण्य म्हणून घोषित झाल्यामुळे या भागातील जैवविविधता आणिपर्यावरण याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

                  शैल कळसूबाई म्हणजे महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट ! महाराष्ट्रसह्याद्रीचं हे सर्वोच्च शिखर. त्याची समुद्रसपाटीपासून उंची भरते १६४६मीटर्स म्हणजे ५४३१ फूट. तळवटीतल्या बारी या गावापासून तब्बल ८०० मीटरचीडोंगरचढाई केली की या शिखरमाथ्यावर पोहोचता येतं. 

                १८६० साली आर्चडीकन गेल या इंग्लिश माणसाने रात्री डोंगरचढाई करूनकळसूबाई शिखरावर पाय ठेवला, तेव्हा पहाट झाली होती. महाराष्ट्राच्यासर्वोच्च शिखरावर त्यानं सूर्योदय पाहिला. त्या अद्‌भुत दृश्‍याने तोचांगलाच प्रभावित झाला. आपल्या लिखाणात त्यानं कळसूबाई शिखराला दि किंग ऑफद डेक्कन हिल्सअसं संबोधले आहे. जगभरातील असंख्य शिखरावर पदन्यास करणारेप्रख्यात गिर्यारोहक इयान मॅकनॉट डेव्हिस यांनी २००३ मध्ये कळसूबाईशिखरावरही आरोहण केले. इंटरनॅशनल माऊंटेनियरिंग अँन्ड क्‍लाइंबिंगफेडरेशनचे ते अध्यक्ष. हिमालयन क्‍लब या प्रख्यात क्‍लबने सर्वांत जुन्यागिर्यारोहण संस्थेच्या पंचाहत्तरी सोहळ्याला उपस्थिती लावणासाठी ते मुंबईलाआले होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी लोरॅटो, ब्रिटिश गिर्यारोहकबॉब पेट्टी ग्रु, जपानी गिर्यारोहक तोमात्सु नाकामुरा व हिरोशी साकाई आदीनामवंत गिर्यारोहक होते. त्यांच्या सोबत हिमालय अक्षरशः पायी तुडवणारेगिर्यारोहक हरीश कपाडिया, जगदीश नानावटी, डॉ. एम.एस. गिल असे दिग्गज भारतीयगिर्यारोहकही शिखरावर आले होते. जणू काही जगातील नामवंत गिर्यारोहकांच हेलघु आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संमेलनच तिथं त्या दिवशी भरलं होतं.

                       अलीकडेच हरिश्‍चंद्रगड-कळसूबाई परिसर अभयारण्य म्हणून घोषित झाला आहे.इथलं जैववैविध्य अनेकांना आकर्षित करत आहे. पण संगमनेरच्या बी.एस.टी.महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक असणाऱ्या डॉ. मोहन वामनयांनी इकॉलॉजिकल स्टडीज ऑफ कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड-रतनगड फॉरेस्टअसेअभ्यासपूर्ण संशोधन करून पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती म्हणजे पीएचडीही पदवी मिळवली आहे. इथे औषधी वनस्पतींच्या शोधात येणारे वैदू, असंख्यपर्यटक, नवरात्रात येणारे भाविक, अतोनात होणारी कारवी या वनस्पतीची बेकायदातोड आणि इतरही अनेक कारणांनी इथल्या जैवविविधतेवर संकट कोसळले आहे. अनेकदुर्मिळ वनस्पतींचे येथील अस्तित्वही धोक्‍यात आलं आहे. असं या संशोधनातआढळलं आहे.

  नामकरण
                      या शिखरसम्राज्ञीच नाव कळसूबाईकसं पडलं? याबद्दल एक लोककथा या रहाळातसांगितली जाते. फार पूर्वीच्या काळी कळसू नावाची एक कोळ्याची (डोंगर कोळीकिंवा महादेव कोळी) पोर याच परिसरात राहात होती. उपजीविकेसाठी इंदरोनावाच्या गावातील एका प्रतिष्ठितांच्या घरी तिनं नोकरी सुरू केली. पणत्याचवेळी केरवारे करणं आणि भांडी घासणे, ही कामं मी करणार नाही, असं तिनंनिक्षून सांगितलं होतं. परंतु एके दिवशी तिला ही कामं मनाविरुद्ध जाऊनकरावीच लागली. जिथे तिने भांडी घासली ती जागा थाळेमेळआणि केर काढायलालागला ती जागा काळदराया नावाने ओळखली जाऊ लागली. मनाविरुद्ध करावंलागल्यानं, नोकरी सोडून लहानगी कळसू शेजारच्या उंच डोंगराच्या शिखरावरगेली. संन्यस्त वृत्तीनं ती तिथे राहिली. ईश्‍वराच्या नामस्मरणात ती दंगझाली. शेवटी तिने तिथेच देहत्याग केला. तिचं नित्य स्मरण व्हावं म्हणूनत्या शिखराला तिचंच नाव दिलं गेलं. कळसूबाईया नावाने त्याची ओळख पटूलागली. पुढे या शिखरमाथ्यावर देवीचं एक लहानसं मंदिरही उभारलं गेलं. तीनमीटर लांबी, रुंदी, उंचीचं हे छोटं मंदिर आहे. त्यावर घमेलं उपट ठेवावं असंअर्धगोलाकार शिखर आहे. आता या देवीलाही कळसूबाई नावानंच ओळखलं जाते.अलीकडेच या पूर्ण मंदिराला शेंदरी रंगाचा तैलरंग दिला गेला आहे. मंदिरासमोरदीपमाळेसारखा एक दगडी स्तंभही आहे. या शिखरावर बारमाही वर्दळ असते. पणसर्वांत उत्तम कालावधी म्हणजे ऑक्‍टोबर ते डिसेंबर. नगर जिल्ह्यातील अकोलेतालुक्‍यात कळसूबाई पर्वत शिखराचा समावेश होतो. संगमनेर-इगतपुरी रस्त्यावरभंडारदरा धरण परिसरातील डोंगराळ प्रदेशात बारी नावाचे एक छोटे गाव आहे. हाकळसूबाई डोंगराचा पायथा. तिथून कळसूबाईच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने चालायलालागलं की एक ओढा लागतो. तो ओढा ओलांडला की डोंगरचढण सुरू होते. अर्ध्यापाऊण तासात आपण एका घरासारख्या बांधणीच्या देवळाशी येतो. याला कळसूबाईचंखालचं मंदिर म्हणतात. समोरच एक ऐसपैस पार आहे. इथून पुढच्या चढणीवर अनेकरानवाटा लागतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, मुख्य मळलेली पाऊलवाटसोडायची नाही. या वाटेवरच जरा अवघड जागांवर आता शासनाने लोखंडीपायऱ्यांच्या शिड्या तीन-चार ठिकाणी लावल्या आहेत. या वाटेच्या उजवीकडेइंदोरे घळ किंवा गोटीची वाट लागते, तर डावीकडे आहे करंडाखिंड किंवापांझराखिंड. उडदावणे या गावातून कळसूबाई डोंगर चढाई करण्यासाठी या कारंडाखिंडीतून जावे लागते. याशिवाय इंदोरे या गावातूनही उत्तरेकडील वाटेनेकळसूबाई शिखरावर पोहोचता येते. नवरात्रात इकडे आलं तर या साऱ्याच वाटांवरराहाळातील ग्रामस्थांची रीघ लागलेली असते. बारी गावातून दोन अडीच तासांचीडोंगरचढाई केली की, कळसूबाई शिखराच्या शेवटच्या चढणीआधी एक बांधीव विहीरलागते. त्यातील पाणी पिण्याजोगे आहे. या पुढच्या वाटचालीत अनेक रानफुलं आणिझुडुपांचं दर्शन होते. आजूबाजूचे दगड धोंडेनी कातळ खरखरीत कडा असलेलेदिसतात. 

                       एखाद्या डोंगरी किल्ल्याचा बालेकिल्ला असावा अशी शेवटची टेकडी लागते.तिथवर जायला पूर्वीची साखळीची वाट, अलीकडेच लोखंडी शिडी लावलेली वाट आणिथोड प्रस्तरारोहण करीत शिखरमाथा गाठायला २-३ पाऊलवाटाही आहेत. शिखराच्याकळसूबाई मंदिरातील देवीदर्शन झालं की आजूबाजूला काही ठिकाणी लोखंडी रेलिंगलावलं आहे. तिथवर जाऊन चहूकडे नजर फिरवावी. उत्तरेचा रामशेज किल्ला, त्याच्यामागून डोकावणारे सातमाळा डोंगररांगेतील सप्तशृंग-मार्कंडा-धोडण, पूर्वेकडे औढा-पट्टा/विश्रामगड-बिनिंग/बिलतनगड, नैऋत्येच्या दिशेकडेअलंग-मदन-कुलंग ही दुर्गत्रयी, पश्‍चिमेकडे दूर अंतरावरील माहुली, माथेरान, पेब, स्वच्छ हवा असेल तर हरिश्‍चंद्रगड, कात्राबाई दिसू शकतात. भंडारदराधरणाचा विस्तीर्ण जलाशय, रतनगड यांचंही दर्शन इथून घडतं. 

                         भंडारदरा धरणाजवळील महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहातमुक्काम करून भल्या पहाटे उठून बारी गावी यावं आणि उन्हाची तल्लखी सुरूहोण्यापूर्वी कळसूबाई शिखरावर पोहोचावं. बरोबर तहानलाडू, भूकलाडू असावेत.शिखर मोहीम आटोपून थोडं उशिरा दुपारच्या जेवणासाठी परत भंडारदऱ्याला यावे.अर्थात आपल वाहन असेल तरच हे सारं सुलभतेने होऊ शकतं. पुण्याहून गिरीप्रेमीसंस्थेने २०१२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर चोमोलुंग्मा/सगरमाथा/माऊंटएव्हरेस्ट येथे नागरी मोहीम आयोजित केली होती. त्यांना शुभेच्छा द्यायला५-६ नोव्हेंबर २०११ रोजी महाराष्ट्रातील असंख्य साहसी गिरीविहारी मंडळींनीकळसूबाई शिखर आरोहण मोहीम आयोजित केली होती. त्या मोहिमेत सहभागी झालेल्यासर्वांनी एका कापडी फलकावर आपली स्वाक्षरी करायची आणि तो फलक एव्हरेस्टवरफडकावला जाणार होता. तेही योजिल्याप्रमाणे पार पडलं. 

                        या एरवी निर्मनुष्य असणाऱ्या कळसूबाई शिखर परिसरात पांझरा/पांजरेगावातील पाच लहान मुली (एकमेकींच्या बहिणी) आपल्या घरच्या शेळ्याराखण्यासाठी एका छोट्याशा गुहेत पावसाळा वगळता ७-८ महिने दिवाबत्तीशिवायवास्तव्याला असतात. सुमारे शंभर-दीडशे शेळ्या आणि या पाच हिरकण्या इथेअसतात. सुमारे एक हजार मीटर/तीन हजार फूट उंचीवर जवळच्या पाणवठ्याचं पाणी, रानभाज्या आणि भाकरी यांच्यावर गुजराण करीत सुमती, मंदा, सुमन, काळाबाई आणिविमल या उघडे आडनावाच्या मुली अवघ्या ५-१० वर्षांच्या आहेत. त्यांचा हावनवास मात्र त्यांना शिक्षणापासून दूर ठेवतो आहे. पण त्यांचे हे धाडसअतुलनीयच मानावे लागले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुणकेश्वर ,अलिबाग

 कुणकेश्वर ,अलिबाग                  कोकणभूमी येथे एकापेक्षा एक सरस आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे पहुडलेली आहेत.रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळचे कन...