कुणकेश्वर ,अलिबाग
कोकणभूमी
येथे एकापेक्षा एक सरस आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे पहुडलेली आहेत.रायगड
जिल्ह्यातील अलिबागजवळचे कनकेश्वर देवस्थान म्हणजे निसर्गाचा ‘सुवर्ण सुंदर’ आविष्कारच आहे.
धार्मिकपर्यटनासाठी
कोकणभूमी म्हणजे ‘अलिबाबाची
गुहा’च आहे.
येथे एकापेक्षा एकसरस आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे पहुडलेली आहेत. रायगड
जिल्ह्यातीलअलिबागजवळचे कनकेश्वर देवस्थान म्हणजे निसर्गाचा ‘सुवर्ण सुंदर’ आविष्कारचआहे. ४००
मीटर उंचीच्या डोंगरावरील हे कोकणवासियांचे श्रद्धास्थान विपुलवृक्षराजी आणि शेकडो
औषधी वनस्पतींनी बहरलेले आहे. स्थानिक तज्ज्ञांच्यामताप्रमाणे खूपशा व्याधींवरील
परिणामकारक वनस्पती येथे आहेत. परिसरातीलअनेक अभ्यासूंनी येथील औषधी वनस्पतींवर
संशोधन करून ‘डॉक्टरेट’ पदवीमिळविलेली आहे. ‘ड्रॉसेरा’सारख्या कीटकभक्षक
वनस्पती तसेच सुवासिक फुलेदेणारे अनंताचे झाड आम्ही येथे पाहिले. २००१ मध्ये येथील
मंदिराला १२५वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्रीगणेशाचा पुष्टीपदी उत्सव मोठ्या
प्रमाणावरसाजरा झालेला होता. श्रीगणेशाची येथील मूर्ती सव्वाशे
वर्षांपूर्वीबडोद्याहून आणलेली होती व भक्तांसाठी शेजारी निवासस्थाने बांधलेली
आहेत.गणेशभक्त श्रीलंबोदरानंद महाराज यांना येथे श्रीगणेशाचे प्रत्यक्ष दर्शनझाले
होते, असे
म्हणतात. त्यांची समाधी शेजारीच आहे.
पुण्याहून
इकडे यायचे झाल्यास शिवाजीनगर एसटी बसस्थानकावरून अलिबागलायेणाऱ्या सकाळी ५, ८, १० वाजताच्या बसेस
सोयीच्या आहेत. त्या बसनेअलिबागच्या अलीकडे सुमारे ५ कि.मी. अंतरावरील कार्लाखिंड
गावी उतरल्यासतेथून कनकेश्वराच्या पायथ्याच्या मापगावी या गावाला जाण्यास भरपूर
रिक्षामिळतात व अंतर सुमारे ८ किलोमीटर आहे. या सहा आसनी रिक्षांना स्थानिक लोक ‘सितारा’ अशा गोड नावाने
पुकारतात. मुंबईहून इकडे यायचे झाल्यास थेटअलिबागला येणाऱ्या एसटी बसशिवाय
समुद्रमार्गे भाऊंच्या धक्क्यावरूनरेवासला येणाऱ्या प्रवासीबोटीने यावे व
रेल्वेहून अलिबागला जाणाऱ्या एसटीबसने कनकेश्वर फाट्यावर उतरल्यास तेथून पायी
१५-२० मिनिटांच्या अंतरावरपायथ्याचे मापगाव आहे. खुद्द अलिबागहून
अलिबाग-किहीम-कनकेश्वर या एसटीगाड्या दर तासाला सुटतात. किहीमच्या रम्य
सागरकिनाऱ्यावर महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासस्थाने
आहेत.
पायथ्याच्या
मापगावातून कनकेश्वराचा डोंगर चढून यायला वळणावळणाच्यारुंद पण कमी उंचीच्या
आरामदायी सुमारे ७५० पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत.अधूनमधून सावली धरायला
वृक्षराजीही आहे आणि पायऱ्यांच्या विशिष्टटप्प्यांवर त्यांना नागोबाची पायरी, गायमांडी, देवाचा पाय अशी
नावेहीदिलेली आहेत. ५०-६० पायऱ्या चढून जाताच पश्चिमेला अथांग सागराचे दर्शनहोते
व डोळे तृप्त होतात. गंमत म्हणजे समुद्र सुमारे दहा-बारा कि.मीअंतरावर दूर
असल्याने लाटांचा आवाज, रौद्रता जाणवत नाही. फक्त पांढऱ्याफेसाच्या लाटा
पुढेमागे होताना दिसतात. किनाऱ्यावरील थळ-वायशेतचा प्रचंडखतप्रकल्प (राष्ट्रीय
केमिकल फर्टिलायझर- आरसीएफ) लक्ष वेधून घेतो.माथ्यावर येताच घनदाट अरण्यात
आल्यासारखे वाटते. डोंगरमाथा बराच विस्तृतअसून, उंच सखल होत गेलेला आहे. सुरवातीला
मारुतीरायाचे आटोपशीर मंदिर आहे.हनुमानाची मूर्ती समर्थांनी वर्णील्याप्रमाणे ‘पुच्छ ते मुरदिले
माथा...’ पद्धतीची
आहे. त्याच्याशेजारी पाण्याचे मोठे बांधीव कुंड असून, त्याला ‘ब्रह्मकुंड’ म्हणतात. पुढे
गेल्यावर उंच जागी कनकेश्वराचे पश्चिमाभिमुखभव्य मंदिर आहे.
लांबरुंद
संगमरवरी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुंदर सिंहशिल्पे आहेत.प्रवेशद्वारात
सूर्यमुखी स्वागतिकांची शिल्पे आहेत. मंडप व गाभारा चकचकीतशुभ्र टाईल्सने सजविलेला
आहे. कनकेश्वराच्या मुख्य पिंडीवर पितळी लखलखीतआवरण असून, त्यावर शिवाचा
रुपेरी मुखवटा आहे. मंदिराबाहेर प्रांगणात तीनफणी नागाच्या डोईवर पृथ्वीचा गोल
दाखविलेला असून, नागाच्या
फड्यातूनपिण्याचे पाणी तोटीने सोडलेले आहे. कनकेश्वराचे वैशिष्ट्य
म्हणजेमंदिराशेजारी असलेली भव्य दशमकोनी देखणी ‘पुष्करणी’. मूळच्या भव्य गोलाकारविहिरीला दशादिशांनी
छेदणाऱ्या पायऱ्या बांधून दशमकोनी सुंदर पुष्करणीबनविलेली आहे. मंदिर परिसरात
इतरही दोन-तीन निर्मळ पाण्याच्या मोठ्याविहिरी आहेत. मुख्य मंदिराशेजारी
त्याच्यासारखेच भव्य असेश्रीरामसिद्धीविनायकाचे आरस्पानी मंदिर आहे. वर उल्लेख
आलेली बडोद्याहूनआणलेली गणेशमूर्ती या मंदिरात आहे. पुष्करणीच्या सभोवताली बल राम
श्रीकृष्णअशी इतर छोटी मंदिरे आहेत.
मंदिराच्या
मागील बाजूला दाट झाडीतून गेलेल्या रस्त्याने पायी गेल्यासपंधरा-वीस मिनिटांच्या
अंतरावर ‘सनसेट
पॉइंट’ आहे.
तेथून समुद्राच्यारुपेरी किनाऱ्यांत अस्तमान होणारे सूर्यबिंब पाहताना मन भावुक
होते.